
नाटक : हरवलेल्या पत्त्यांचा बंगला
लेखक: स्वरा मोकाशी
दिग्दर्शक: चंद्रकांत कुलकर्णी
कलाकार: प्रतिक्षा लोणकर, दिप्ती लेले, राजन जोशी, अथर्व नाकती आणि वंदना गुप्ते
काल 28-Oct-22 ला 5:00 pm वाजता यशवंतराव मधे हे नाटक पाहीले.
आधी पाच मिनीटं नाटक अपील झालं नाही, मुलं अमेरीकेत असलेल्या कोथरुड मधल्या म्हाता-यांचं श्रीमंत दुखणं आहे का अशी शंका आली,पण नंतर नाटकाने पकड घेतली, हे वेगळं रसायन आहे हे कळलं आणि हरवून गेलो.
चाळीत छोट्याशा जागेत राहूनही नातेवाईकांना आधार देऊन, उस्तवार कष्ट करणारी आई उतारवयात ही इतरांसाठीच खपत असते,
सदैव आपल्या मुलांसाठीच जगलेल्या इंदीरा वर स्वतःचे घर सोडून जाण्याची वेळ येताच paying guest निधी तिला भानावर आणते आणि तिचे हरवत चाललेले जगणे शोधायला मदत करते. कथेच्या ओघात अशा घटना घडत जातात कि शेवटी इंदीरा धीर करून एका निर्णयाशी येऊन ठेपते.
"आईने मुलांवर संस्कार करायचे असतात; त्यांचे संसार करायचे नसतात ! "
किंवा
‘त्यागालाच सर्वस्व मानणाऱ्या काळात आमचा जन्म झालाय’ अशा आशयाची अनेक वाक्ये.
काय जबरदस्त dialogue लिहीलाय लेखिकेने...
" संसाराच्या आगीमधे ज्याचा ताठा नाहीसा झाला आहे आणि मऊसूत उबदारपणा उरलाय अशाच कापडांची गोधडी बनते !! "
.
विविध स्वभावांच्या नात्यांची रंगीबेरंगी गोधडी विणता आली तर किती छान या अर्थाचा काहीसा...
लग्नात एकाच रंगाच्या साड्या नेसण्याचा मैत्रिणीचा प्रस्ताव धूडकावत म्हणते,
"त्यापेक्षा आपल्या रंगाचा ड्रेस अधीक उठून दिसेल"
वंदना गुप्ते यांनी एकहाती नाटक लीलया पेललयं, big applaud 👏🏻👏🏻👏🏻👏🏻त्यांच्यासाठी,एवढे संवाद त्याच्या timing सह एवढ्या परीणामकारक पोचवणं सोपं नाहीये.
wrong investment नवीन शब्द !
आयुष्यभर मूलांसाठी /इतरांसाठी खस्ता खावून शेवट वृद्धाश्रमात काढणा-यांसाठी, "त्यांनी wrong investment केली", अशी अतिशय चपखल उपमा वापरलीय नाटकात.
सध्या सत्तर पंचाहत्तर चे जे एकाकी सिनीयर्य आहेत त्यांनी तंत्रस्नेही (techno-savvy) होणं फार आवश्यक आहे, कारण बस ट्रेन फ्लाईट, नाटक सिनेमाची टिकेटस् असो, रेस्टाँरेंटस् मधून खाणं मागवणं असो,उबर ओला कॅब मागवणं असो,लाईटबीलं भरणं, सर्व काही online झालयं,यावर नाटकात फार मार्मीक comment आहे,ती मुळात ऐकण्यासारखी आहे, आम्हाला माणसाचा आधार लागतो या अर्थी.
before i forget मला अशोक पत्कींच्या पार्श्वसंगिताचं कौतुक करु द्या, खूप फ्रेश आणि सफाईदार व सुश्राव्य संगित फार आकर्षक आहे, नाटकाच्या मूडप्रमाणे बदलणारं संगित जणू एक पात्र चं आहे.
समजूतदार जावई च्या भूमिकेत राजन जोशी परफेक्ट काम करतात.
नातू च्या अल्लड व खेळकर भूमिकेत अथर्व नाकती इतका perfect बसतो कि हा dream choice वाटतो,इतका youthful आणि चैतन्यशील वाटला.
एकाकीपणा घालवण्यासाठी एकटेच पत्ते खेळणारे वृद्ध अधीक केलीलवाणे की त्यांचे खोटे कौतुक करुन, त्यांना झेपत नसतांना,जास्त काम करुन घेणारं मुलाबाळांच गोकूळ जास्त केवीलवाणे हे मला ठरवता येईना ...🤔
paying guest निधी ची भूमिका दिप्ती लेले ने केलीय,खूप mature, भावपूर्ण आणि instingct follow करणारी अवघड भूमिका अतिशय convincingly केली आहे, तिच्यात talent आहे.
प्रतिक्षा लोणकर ने मुलीची डावपेची व थोडी स्वार्थी भूमिका ती खरचं तशी आहे असे वाटण्या एवढी चांगली केली आहे,भूमिकेला निगेटिव शेड आहे,ब-याचं मुली अशा असतात,त्यांनीही हे नाटक पहाण्याची गरज आहे.
नाटकात लेखिका व दिग्दर्शक यांनी हूकूमी twist आणू शकतो याची दोनदा झलक दिलीय, एकदा निधी,इंदिरा व इशान एका लाईट मोमेंटला एकत्र हसत बसलेले असतांना अचानक प्रतिक्षा लोणकर येऊन निधीला चल pack up कर लवकर,तुझे पप्पा तुला घ्यायला आलेत असे म्हणते त्यावेळी sudden mood change किवा sudden mood sublimation चा प्रसंग अंगावर येतो !
(sublimation = chemical reaction where solid gets converted to vapor form)
एक चांगली councilling treatment असं ही हे नाटकं पाहून वाटलं. स्वत:साठी किंवा कुणासाठी काही करावसं वाटलं तर लगेच करा कारण कल हो ना हो. हा संदेश चांगला पोचवतं हे नाटक.
अभिनंदन लेखिका स्वरा मोकाशी यांचे , सर्व back stage artist चे, निर्मात्यांचे,नेपथ्यकार,lights sound enginers चे,आणि अर्थातच वंदना गुप्ते आणि सर्व कलाकारांचे.
विशेष आभार दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचे, नाटक tailored मापात बसलय म्हणजे विषयावर एकदम आटोपशीर आहे.
प्रेक्षक मुख्यत: सिनीयर सिटीजन होते, जाणकार होते, योग्य जागांवर दाद देत होते. एक चांगले नाटक पाहील्याचे समाधान मिळाले.
प्रेक्षकांनी कडक टाळ्यांची पावती देत नाटक आवडल्याचं तात्काळ कळवलं, ऐका 👇🏻