Tuesday, 20 May 2025

डॉ. जयंत नारळीकरांची आठवण येतच राहणार.




photos from internet with thanks

2008 august ची गोष्ट.

आमचा सतरा जणांचा ग्रुप थायलंड मलेशिया सिंगापूर टूर करून परत येत होता. विमानात माझी मुलगी ऋतुजा म्हणाली,

" पप्पा आपल्या मागे जे आंटी, अंकल बसलेत ना ते जम्बो सुडोको सोडवताहेत "

 असतील कोणी गणिती ब्रेन्स असे म्हणून मी निवांत बसलो,नंतर उत्सुकतेने कोण असावेत म्हणून मी वळून बघितलं आणि काय आश्चर्य आमच्या मागच्या सीटवर साक्षात डॉक्टर मंगला नारळीकर आणि डॉक्टर जयंत नारळीकर बसलेले होते मी क्षणार्धात त्यांना ओळखलं पण तरीही माझा विश्वास बसत नव्हता कारण एवढे महान शास्त्रज्ञ इकॉनॉमिक क्लास मधून कसे येतील हा प्रश्न मला पडला.

 मी मितालीला सांगितलं की मला शंभर टक्के खात्री आहे हे डॉक्टर जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर आहेत. मिताली चक्क त्यांनाच विचारलं,

" आपण डॉक्टर जयंत नारळीकर आहात का? "

 त्यांनी हसून हो म्हटलं,

 मग काय माझ्यासकट सगळ्यांचीच त्यांच्याशी हात मिळवून अभिवादन करण्याची रांग लागली.

डॉक्टर नारळीकर यांना मी त्यांच्यावर महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी मासीक मध्ये एक लेख लिहिल्याचे सांगितला "एका बातमीचा मागोवा" असे त्या लेखाचं शीर्षक होतं आणि पेपर मधली एक बातमी होती त्यात त्यांनी प्रेडिक्ट केलं होतं की विषाणू हे अवकाशातून येतात त्यावर मी लिहिलं होतं, त्यांनी उत्सुकतेने माझे बोलणे ऐकलं.

 बॅगेज बेल्टजवळ ही मी त्यांच्या मागे घुटमळत होतो, बेल्ट वरून त्यांच्या बॅग काढून देण्यास मी मदत केली. पुण्याला ते आमच्या गाडीतून येतील का? अशी संधी आपल्याला मिळेल का असा मी विचार करत होतो त्यांच्या प्रायव्हसी मध्ये अतिक्रमण करणे योग्य ठरेल की नाही हे मला ठरवता येईना,मी  मंगलाताईंच फोनवरच बोलणं ऐकलं त्या बहुतेक मुलीशी बोलत होत्या,

" काही नको वरण-भात कर फक्त"

असं ऐकलं ,त्यांच्या सादगीचं मला अतिशय आश्चर्य वाटलं, आदर वाढला.

मी जेव्हा ही गझल ऐकतो तेव्हा मला डॉ. जयंत नारळीकरांची च आठवण येते..

"धनक में चांद नहाया, तो तेरी याद आयी,             जहाँ में कोई भी भाया तो तेरी याद आयी... "

धनक = इंद्रधनुष्य 

हे असं शक्य आहे का कि ही फक्त कविकल्पना आहे असे मला त्यांना विचारायचे होते ते राहून गेले,

"गेले राहुनी तुझे नक्षत्रांचे देणे,                      माझ्यापास आता स्मृती                                      आणि पुस्तक पाने.."

सूर्य आपल्या पाठीमागे चमकत असावा, नुकताच पाऊस पडून गेला असावा, संध्याकाळची वेळ असावी,इंद्रधनुष्य दिसावं आणि चमत्कार...आकाशात (पौर्णिमे चा) चंद्रमा उगवावा.

एकदा मी बातमी वाचली आणि डॉ. जयंत नारळीकरांची च आठवण आली,ते सुलभ सोपे असे समजून सांगतील.

शास्त्रज्ञांनी अंटार्टिका वरचा बर्फ उकळवला पूर्ण पाण्याची वाफ झाल्यानंतर त्यांना खाली काही लोखंडाचे कण दिसले.

हे लोखंडाचे आयसोटोप (समस्थानिक)होते, हे iron-60 आयसोटोस पृथ्वीवरच काय तर आपल्या संपूर्ण ग्रहमालेत उपलब्ध नाहीत, ते iron-60 isotops 2000 साली पृथ्वी वर आले असे मी वाचले, हा कॉस्मिक किरणांचा परिणाम होता असे नंतर कळले तेव्हाही मला डॉक्टर नारळीकरांची आठवण झाली त्यांनी आपल्याला अतिशय सोपे आणि कळेल असे स्पष्टीकरण दिले असते

डॉक्टर नारळीकरांची आठवण येतच राहणार.

प्रकांड पंडित आणि साधेपणा असे हे व्यक्तिमत्व पृथ्वीवर वावरून गेले हे येणाऱ्या पिढ्यांना कसे कळेल?

राजेश मोराणकर 9822865559

rajeshmorankar@gmail.com

--------------------------------

(The iron isotope found in Antarctic snow and associated with supernovas is called iron-60 (according to Natural Habitat Adventures and Scientific American). This isotope is produced in the cores of massive stars and ejected into space during supernova explosions. It's a radioactive isotope with a half-life of 2.6 million years.)

----------------------------------


Thursday, 2 January 2025

एक बोंबललेली काॅमेडी.... मु.पो. बोंबिलवाडी

 Film Review

चित्रपट परिक्षण

मु. पो. बोंबिलवाडी

निर्मिती: मधुगंधा कुलकर्णी, भरत शितोळे
पटकथा, संवाद, दिग्दर्शन: परेश मोकाशी
कलाकार: प्रशांत दामले, आनंद इंगळे, वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, सुनिल अभ्यंकर, राजेश मापुस्कर, प्रणव रावराणे, अद्वैत दादरकर, गणेश मयेकर, मनमीत पेम, रितिका श्रोत्री, दीप्ती लेले
छायांकन : सत्यजित श्रीराम
संकलन : अभिजित देशपांडे
वेशभूषा : पूर्णिमा ओक
कलादिग्दर्शन : संतोष फुटाणे

1 जानेवारी 2025 ला Citypride, पुणे ला हा पिक्चर पाहिला.

तेच आलू,टमाटर प्याज...

हाॅटेलमधे चमचमीत डिश होते,

तेच वापरुन एखाद्या "सुग्रणीने' घरी रेसिपी बनवावी आणि सपशेल फसावी तसं ह्या पिक्चरचं झालयं.


का ????

ट्रिटमेंट बाबा ट्रिटमेंट !


हेच वैभव मांगले फूलवंतीमधे किती impressive वाटतात...इथं का नाही?

कारण कोकणातल्या दशावतार सारखं नाटक आणि एकदम dull color फिल्म एखाद्या जुन्या vidio camera तून shoot केल्यासारखी दिसते आणि बाळबोध विनोदी script.


तुम्ही कुणासाठी बनवलात... शाळेतील विद्यार्थ्यांसाठी का? OTT पाहून निब्बर झालाय odience आणि हे सगळं खूप बाळबोध झालयं.


Farcicle बनवायचाय तर तुमच्याच वाळवी फिल्मकडे बघा. किंवा Welcome फिल्म मधला climax बघा, ती सफाई अपेक्षीत असते.

किंवा 'कट्यार काळजात घूसली' पिक्चरचा भरजरी richness आठवा, ते picturisation आणि तुमचं नाटकाचं picturisation बघा, नवख्या माणसानं जुन्या camera वर केल्यासारखं dull वाटलं.

माफ करा पण अगदीच अपेक्षाभंग झाला, पहिल्या 5 मिनिटातचं उठून जावसं वाटलं.

(आणखी एक, हिंदूस्तानी स्वातंत्रलढ्यावर काॅमेडी दृष्टीने विचार करणे व्यक्तीगत मला आवडले नाही...असो.)


एक प्रश्न पडला, हे टूकार होतयं असं अभिनेत्यांना वैभव मांगले, आनंद इंगळे ह्यांना परेश मोकाशीना सांगावसं वाटलं नाही का??


प्रशांत दामलेंचा हिटलर गेटअप, आणि बेअरींग झकास आहे.प्रशांत खूप देखणा दिसलाय.

मधेमधे काही पंचेच आवडले, 

" ए अडाॅल्फ खेळायला येतोस का?'

" ती अॅडी म्हणते ना तुला?'


एकंदरीत काॅमेडी फसलीय.

शेवटपर्यंत पहात बसणे खूपचं torture वाटलं.


इतकी मेहनत, परेश सारखा कल्पक दिग्दर्शक, वेभव मांगले, आनंद इंगळे, प्रशांत दामले आणि इतर गुणी कलाकार, चांगले मेकप आर्टीस्ट तरी पिक्चरचं disaster का झालं??????

मराठी पिक्चरला सिनेमागृहामधे जावून पाहून सपोर्ट करावं ही भावना असते पण तसे मेरीट असावे लागते ना.

-------------------------------------------------

Rating

---------------------------------------------------





Saturday, 12 October 2024

माझ्या कविता

This poem for dear Darshan

11-feb-2025

*महाकुंभ 2025...*


झाले त्रिवेणी 'दर्शन',

भाग्याचा हा क्षण,

मोक्षाचे आरक्षण,

आपोआप ||


महाकुंभ जे येती

आस्थे ची डुबकी घेती,

सहज ची घडती,

अमृत स्नान ||


144 वर्षानंतर,

श्रद्धालु चे अंतर,

साक्षात शिवशंकर,

जैसा देखा ||


बम बम भोले,

मन देह डोले,

मुखी शब्द आले,

हर गंगे ||


महाकुंभ यात्रावास,

सज्जनांचा सहवास,

मन प्रसन्न, पूर्ण आस,

समाधान ||


# शीघ्रकवी



🙏🏻❤️


घ्या कवीता 14- Jan-2025


आली संक्रांती,

करुया सुधारणा

सवय सूक्ष्म क्रांती,


सकारात्मक बदल

व्यक्तीगत आचरण,

तो सूर्य उत्तरायण ।।


आकांक्षांचे पतंग,

आणि ध्येयाचा चंग,

उत्साहाचा वारा,

निराशेला ना थारा ।।


तीळगूळ स्नेह,

प्रेममय मन देह ।।


तीळगुळ घ्या

गोड बोला...

तीळगुळ घ्या

गोड बोला...


# राजेश्वर

--------------------------------


नववर्ष स्वागत...


उलटले कॅलेंडरचे पान,

गाऊ नववर्षाचे गान ।।


काळाचे चक्र फिरले,

आणि एक वर्ष सरले,

जल्लोश आतषबाजी,

गतक्षणांची आठव ताजी।।


मी तोच, तुम्ही तेच,

नववर्ष हे,जग तेच.

फक्त काळाची मोजणी,

नको चुकांची टोचणी।।


नवी आशा,नवी स्वप्ने,

नवे संकल्प मनी जपणे,

नवनवीन शिकत राहूया,

नवा प्रांत,नवे जग पाहूया।।


राहू आहार विहार दक्ष,

आरोग्यावर असो लक्ष,

लाभो सर्वा सुख आरोग्य,

सर्वांचेच उजळो भाग्य।।


हेच मनोगत,

नववर्ष स्वागत ।।


# राजेश्वर 

01-जानेवारी-2025

-----------*-----------*----------


30-Oct-2024


 दिवाळी


दारात रांगोळी,

अभ्यंग आंघोळी ।।


फटाक्यांचे आवाज,

आणि  दिव्यांचे राज ।।


फराळाचे ताट,

असे काठोकाठ ।।


आकाशकंदील रंगीत,

दिवाळीपहाट संगित ।।


वाजू दे मनात गंधार,

होऊ दे तेजोमय मन,

जावो मनातील अंधार ।।


---राजेश्वर

----------------------------------

12-Oct-2024

शुभ दसरा

झेंडूंची रास,

फूलांचा वास,

नविन भास,

सण हा खास,

आला दसरा ।।


गरब्या ची लय,

आदिशक्ती जय,

दृष्टावर सृष्टाचा, 

आज शुभविजय,

जयश्रीराम जय,

आला दसरा ।।


आपट्याची पाने,

हे सोने नाणे,

आज लूटावे,

विचारांचे सोने,

शुभेच्छा दसरा ।।


# राजेश्वर

----------------------------

07-Sept-2024

घ्या कविता (अभंग form)


ज्याची सर्वा ओढ,

आला भव्य सणेशु,

आला प्रिय गणेशु,

विराजला।।


घरोघर लगबग,

सर्वत्र उत्सव,

सर्वत्र उत्साह,

संचारला।।


रांगोळ्या गुलाल,

सजली आरास,

फूलांची रास,

सजावट।।


दणाणले जयघोष,

स्तोत्रघोष आरती,

आसमंत भारती,

मंत्रमय।।


नैवेद्याचा दरवळ,

मोदकांचा स्वाद,

तृप्त घेता आस्वाद,

सर्वजण।।


आता आहे चालणार,

ढोल ताशे जल्लोश,

रोज  आरती जोश,

दहा दिस।।


# राजेश्वर


--------------------------

सुपारी          10-April-2024

महा नव निर्माण

झाले,

महा 'नमो' निर्माण !



चांगला मुद्दा

धरसोड वृत्ती

भोंगा,टोल,

त्याची आवृत्ती


शाह भेटले

दूपारी आज ।

लाज टाक रे

सुपारीबाज ।।



बिनशर्त पाठींबा (?!)

पोराला द्यायला,

खासदार बेंच ।


बापाला कळले

जगात नसतो

कधी फ्री लंच ।।

-------------------------------

गुढी पाडवा 🚩    09-April-2024


चैत्राची पालवी,

मरगळ घालवी ।।


कोकीळ कूजन,

श्रीराम पूजन ।।


तारीख रचली,

अयोध्या सजली ।।


मंदिर नवे,

चैतन्य सवे ।।


मंदिर मालकी,

रामाची पालखी ।।


गुढ्या तोरणे,

नयन पारणे ।।


आला मधूमास,

संपला वनवास ।।

--------------------

पक्षांतर               09-April-2024


74 हे त्यांचे वय,

मनी-मॅग्नेट सवय ।।


सावित्री जिंदाल ।

काँग्रेस मधे ,

गळली नाही दाल ।।


देशातील सर्वात

श्रीमंत महीला....

काय पाहीजे

असेल हिला ?!


29 अब्ज डाॅलर्स,

2800 कोट रुपया ।

म्हणजे किती अंबानी

नका विचारु कृपया ।।


गुंतवणूक असो,

उर्जा,इंफ्रा,सिमेंट,

पेंट आणि लोखंड ।


अमेरीका ते चिली

युरोप आणि युए ई

कारोबार अखंड ।।


केला प्रवेश

मोदी परीवार ।

काय पूढची चाल

काय विचार ।।


# राजेश्वर

-----------------------------


डीलर झाले लिडर ।

भित्रे झाले नीडर ।।


झाले भाजपा-वासी,

 धरला भगवा दामन ।।

दाग अच्छे है...,

दागी झाले पावन ।।


नानांचा रिक्रृटमेंट ड्राईव्ह,

चर्चा हाॅटेल स्टार फाईव्ह ।।

नेत्यांना करा अगवा,

व द्या हाती भगवा !!


कालचा जो चोर, 

आजचा अर्थमंत्री।।

काल जमीन-चोर,

आज थोर लोकतंत्री ।।


पहायचय अजून फार ।

मिशन चारसो पार ।।

--------------------------



Thursday, 20 June 2024

लोक मांजर का पाळतात !??

लोक मांजर का पाळतात ?                                  एक मानसशास्त्रीय मागोवा....


बऱ्याच वर्षापासून मला हा प्रश्न पडलाय लोक मांजर का पाळतात? कुत्र्याचं समजू शकतो कुत्रा वफादार असतो घराची राखण करतो पण मांजर काय करतं, मांजर काहीच करत नाही ,कुत्र्याचं असं आहे की कुत्र्यावर प्रेम केलं तर , मालकावर जीव लावतो,कुत्रा मालकासाठी जीव देतो !!


तरीही लोक मांजर का पाळतात या प्रश्नावर मी अनेक वर्षे विचार करतोय आत्ताच मी रत्नागिरीला गेलो होतो तिथं बोलताना असं कळलं की रत्नागिरीत 27 लाख रुपयांची  मांजरं लोकांनी विकत घेतली आहेत मांजराचे खाणं विकत घेतले त्यामुळे पुन्हा तो जुना विषय वर आला की लोक मांजर का पाळतात. मांजर काहीही सर्विस देत नसतानाही लोक मांजरावर एवढे पैसे का खर्च करतात आणि दुसरं म्हणजे आता लोकांना आपलं देशी मांजर चालत नाही आता पर्शियन ( instagram वर photo टाकायला बरं) ते आणखी गल्ले लठ्ठ आणि जास्त आहार खाणार आणि जास्त महाग असतं तरी लोक त्याच्यावर पैसे खर्च करतात आणि ते मख्खपणे घरात वावरत असतं त्याच्या चेहऱ्यावर थोडाही gratitude आणि कणभर ही कृतज्ञता नसते ते मस्तपैकी घरातल्या सोफ्यावर लोळत असतं गादीवर लोळत असतं आणि खाण्याची वेळ झाली की ते आपलं म्याऊ करून थोडसं घुटमळतं आणि खाणं मिळालं की दूध मिळालं की ते पिऊन घेतो आणि थँक्स वगैरे काय व्यक्त करायचा प्रश्नचं  नसतो आणि निवांतपणे मांजर वावरत असतं आणखी एक गंमत म्हणजे मांजर कधीही घड्याळ बघत नाही( i mean unlike कोंबडा, मांजराला दिवसरात्र असे काहीही पडलेले नसते) वेळ आणि मांजर याचा काहीही संबंध नाही मांजर निवांत वेळ घालवत असतं किंबहुना मांजराचा आयुष्य म्हणजे निरुद्देश वेळ घालवणं असतं.

 तर असं असूनही लोक मांजर का पाळतात ? why ???


आता दुसरा विषय म्हणजे जगात एवढी गुन्हेगारी, एवढा क्राईम एवढा द्वेष असूनही ,माझं दृढ विश्वास आहे स्ट्रॉंगली बिलिव्ह करतो की जगात प्रेम जास्त आहे आणि एवढं जास्त आहे की प्रेम वाटून शिल्लक राहिलेले . माझा असा विश्वास आहे की जगात अथांग  प्रेम ' un-used  शिल्लक आहे मग या शिल्लक राहिलेल्या प्रेमाचं काय करायचं. तर जगात जसं समुद्राचं पाणी अथांग आहे अमर्याद आहे तसेच  जगात न वापरलेले प्रेम अमर्याद आहे तर या प्रेमाचं काय करायचं या प्रेमाला कुणीतरी रिसिव्हर पाहिजे म्हणजेच या प्रेमाला बिनशर्त स्वीकारणारा कोणीतरी पाहिजे आणि गंमत म्हणजे नुसता स्वीकारणारा पाहिजे. त्याची रिटर्न गिफ्ट म्हणून पुन्हा प्रेम करणारा नकोय कारण प्रेम आधीच खूप जास्त झालंय ना त्यामुळे फक्त स्वीकारणारा पाहिजे, निमुटपणे स्वीकारणारा पाहिजे आणि इथेच कळीचा मुद्दा आहे की मांजर निमुटपणे तुमचं प्रेम स्वीकारतं, तुमचं प्रेम सहन करतं बर्दाश्त करतं आणि काहीच करत नाही काहीच प्रतिक्रिया देत नाही.

शायर म्हणतात,

तेरे जहाँ मे ऐसा नही के प्यार ना हो,तेरे जहाँ मे ऐसा नही के प्यार ना हो,जहा उम्मीद हो इसकी वहा नही मिलता....कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता

तर जिथून अपेक्षा आहे तिथून प्रेम मिळत नाही, ज्यांच्यावर प्रेम करायचे आहे ते प्रेम स्वीकारत नाहीत....काय करायचे या un-used शिल्लक प्रेमाचे ???

मांजर निमुटपणे तुमचं प्रेम स्वीकारतं, तुमचं प्रेम सहन करतं बर्दाश्त करतं आणि काहीच करत नाही काहीच प्रतिक्रिया देत नाही हेच पाहिजे असतं लोकांना.

---------------------------

आता तिसरा मुद्दा हे मी सांगतो हे visiulize करण्यासाठी.. पूर्वीचं आठवा की पूर्वी घरोघर सुट्टे पैसे खूप साठलेले असायचे. एखादा डबा असायचा आणि त्याच्या ढिगभर सुटे पैसे साठलेले असायचे आमच्या घरी पण डब्यात खूप सुटे पैसे साठलेले होते.

कारण काय व्हायचं बाहेर जाताना मी सुट्टे पैसे घेऊन जायला विसरायचो, नोटा खर्च करायचो आणि समज ते 70 पैशाची काही वस्तू घेतली तर 30 पैसे सुट्टे परत यायचे कधीतरी काहीतरी वीस पैशाचा घेतल तर 80 पैसे सुटे घ्यायचे असे मी घरी घेऊन यायचो.पण पुन्हा  बाहेर जाताना सुटे पैसे घेऊन जायचे विसरायचो त्यामुळे घरात सुट्टे पैसे वाढतच चालले होते तर हे visiualize करा हेच तुम्ही समजा की तुम्हाला सुटे पैसे खपवायचे आहेत तर तुम्ही कुणाला तरी सुट्टे पैसे दिल्यावर त्यांनी परत तुम्हाला सुट्टे पैसे देऊ नये इथेच मांजराचं महत्व लक्षात येतं की मांजर प्रेम स्वीकारताना तुम्हाला रिटर्न प्रेम देत नाही आणि हेच आपल्याला पाहिजे आहे, सुट्टे पैसे संपवायचेत तसेच जगात असलेले हे अथांग शिल्लक प्रेम लोकांना संपवायचेआहे, तिथे कोणीतरी स्वीकारणारा पाहिजे आणि मांजर हे करतं. म्हणून लोक मांजर पाळतात की मला प्रेम कोणाला तरी द्यायचे आणि त्याच्या बदली मला प्रेम नकोय त्यांनी फक्त प्रेम मुकाट्याने स्वीकारलं पाहिजे मांजर मुकाट्याने प्रेम स्वीकारतं हा मांजराचा गुण आहे म्हणून लोक मांजर पाळतात अशा conclusion मी आलो आहे.

so my dear watson, this is opened and closed case. विषय संपला आहे.                      उत्तर सापडलं आहे .

----राजेश मोराणकर

--------------------------------------------------------

Saturday, 8 June 2024

नकळत सारे घडले (शुभारंभचा प्रयोग) impression: पाहीलेच पाहीजे असे नाटक. प्रयोग, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे, 8-June-2024)





  अलीकडेच ‘मित्रम्हणे’ पॉडकास्टला सौमित्र पोटेंच्या मुलाखतीत आनंद इंगळे  म्हणाले, “अलीकडचा सिनेमा प्रचंड बदलला आहे. कारण, काम करणारी पिढी सुद्धा तुफान हुशार आहे. आजच्या काळातला सिनेमा हा जास्त हुशार आहे. आजही माझा असा दावा आहे की, आपल्याकडे सिनेमात जेवढे विषय येतात त्याला प्रेक्षकांची साथ लाभत नसेल पण, आपल्या सिनेमांचे विषय हे खरंच खूप छान असतात. तरुण मुलं इतक्या सुंदर स्क्रिप्ट घेऊन येतात, त्यावर लिखाण करतात मग, चित्रपटासाठी काम करतात खरंच सिनेमात खूप बदल झालाय.”

-------------------------------------------
आज (8- जून-2024) ला मित्रमंडळींसह 
नकळत सारे घडले हे नाटक पाहीले.

आनंद इंगळे बटूमामा,
भाचा राहूल (प्रशांत केणी), 
दुबईत असणा-या बहीणीच्या मुलाचा केअरटेकर म्हणून बटूमामा जबाबदारी घेतो. 
राहूल ला  कसेतरी MBA चा अभ्यासक्रम पास कर हा त्याचा आग्रह असतो.

पण ,भाचा हमारा ऐसा काम करेगा"
मगर ये तो कोई ना जाने
कि मेरी मंज़िल है कहाँ...."

कारण भाच्या ला फिल्ममधे काम करण्याचा किडा चावलेला असतो, त्या वेडात तो अभ्यासाकडे दूर्लक्ष करतो.
मैत्रीण त्याचा फिल्म चा ध्यास समजण्याचा प्रयत्न करते व काॅलेजचा अभ्यास सोडू नको असं सांगण्याचा प्रयत्न करत असते.

बटूमामा जून्याकाळचा व त्यात अध्यात्मिक महाराजांचा भक्त असल्याने भाच्याचे फिल्मी वेड वेळोवेळी पाणउतारा करुन हाणून पाडतो.
 दोन पिढीतील 'जनरेशन-गॅप' मुळे संघर्ष निर्माण होतो.

इथचं श्वेता पेंडसे ची एंट्री होते. ह्या मुलाला हळूवार समजावून घेऊन सही मार्ग दाखवण्यासाठी councilling ची गरज आहे हे तिला कळते. आणि ते ही भाषण न देता संवादातून पटवून देण्याची गरज आहे हे तिला वाटते.
प्रत्येक वेळी भाचा चूक नसतो, त्यामुळे हालात चे टक्केटोणपे खाऊन पक्के झालेले बटूमामा यांच्या विचारांचे ही परीवर्तन करावं लागणार हे अवघड काम तिच्या डोक्यावर पडतं.

भाचा फिल्मस्टार होतो का? बटूमामा आपली जबाबदारी पार पाडतात का? मैत्रीणीची support-service कामी येते का? 
जाननेके लिये पाहिलचं पाहीजे हे नाटक.

घरोघरी आपल्याला हा संघर्ष पहायला मिळतो,
मुलांमधे उर्जा असते, talent असतं, काही नवीन करायचं असतं...
दूसरीकडे पालक त्यांचे शुभचिंतक असले तरी, स्वत: काढलेल्या कष्टप्रद आयुष्याच्या अनूभवातून मूलांना नवीन वाटेचा धोका पत्करु देत नाहीत, मुलं फसतील अशा भितीने पालक मुलांना नेहमी ओरडतात, हतोत्साहीत करतात,नकारात्मक टोमणे मारतात.
मग संवाद तूटतो व मुलं एकाकी होतात.

हे नाटक कुणा एकाचं बरोबर अशी बाजू न घेता, संवादातून surgical-operation करुन तूटलेली नाती पुन्हा स्थापन करण्याची प्रेरणा देतं.पालक व मुलांमधे प्रेम असतचं, हे नाटक त्या प्रेमाचा पुनर्शोध लावून देतं.

impression: आनंद इंगळे छा गेलेत. सहजसुंदर वावर, सूक्ष्म अभिनय, देहबोली, कष्टमय आयुष्यातून आलेला stubbornness , प्रसंगनिष्ट विनोद ...संवाद नसतांनाही reactions...खूपच काबील-ए-तारीफ आहेत....जबरदस्त.

दोनच दिवसांपूर्वी " 38 कृष्णव्हिला" हे नाटक पाहिले होते, त्यातल्या श्वेता पेंडसे यांचा प्रभाव अजून ओसरला नव्हता तेवढ्यात ह्या नाटकात भारी काम पाहीलं... खूप pleasent वावर, संवादफेकीची उत्तम timing..   councilling करतांना संयम , आणि चूक दाखवून देणे, दूस-याचं कष्टमय संघर्षाला दाद देण्याचा उमदेपणा त्यांनी छान दाखवला.

राहूल (प्रशांत केणी) याने आपले काम खूप impressive केले, तरुणांचा स्वप्नाळूपणा, बेफिकीरपणा तर कधी भाबडेपणा आणि मामावरचे प्रेम त्याने अचूक दाखवले. ह्या मुलाची निवड भूमिकेसाठी एकदम perfect आहे.

मैत्रीणीच्या तनिषा वर्दे भूमिकेत हीने खूप छान काम केले आहे, तरुणाई culture असूनही मामासाठी प्रेमाने मदत करण्याची भावना योग्य दाखवली.मित्रासाठी support देण्याची friendship आणि संवाद नसतांनाही चेह-यावर reactive भाव उत्तम दाखवले.
आनंद इंगळे/ श्वेता पेंडसे असूनही काही दडपण न घेता सहज काम केले.
तनिषा वर्दे , प्रशांत केणी ह्यांना रंगमंचावर दिर्घ करीयर आहे.

संगीत : अशोक पत्कींचं पार्श्वसंगीत खूप fresh आणि प्रसंगाला अनूरुप आहे.
(एखाद्या गीताचा विचार व्हावा)

दिग्दर्शन : विजय केंकरे ...नाम ही काफी है.
" you caught me napping..." ह्या dialogue मधे (दोनदा) दिग्दर्शकाचा presence आहे !!

लेखक : विषय / खोली / नाट्यमयता / संघर्ष / वाद आणि problem solving या सर्वच विषयात लेखक शेखर ढवळीकर यांनी बाजी मारलीय.
हे नाटक चालेल, विषय evergreen आहे.

---------------------------------------
Rating : ★★★★
राजेश मोराणकर

---------------------------------------
प्रेक्षकांनी टाळ्यांची पावती दिल्यावर 
आनंद इंगळे यांचं निवेदन video 👇🏻




Monday, 15 April 2024

Your pack on earth is 'recharged'... enjoy... happy stay !



"Your pack on earth is 'recharged'... enjoy... happy stay !"

मी : कसला पॅक रिचार्ज झाला म्हणताय?
"अहो तुमचा पृथ्वीवरच्या वास्तव्याचा पॅक रिचार्ज झाला !"

मी :" पण पेमेंट  ??"

झालं.. Received with thanks या जन्मातल्या पुण्य-संचया मधून जे पॉईंट्स ऍड होत होते ना त्यातून पेमेंट झाले.

मी : अहो पण मी काय पुण्य केलं?

" कुणाविषयीही द्वेष ,असूया केली नाही, कायम आनंदात राहिलात, प्रत्येकाशी प्रेमाने वागलात. काम केलं आयुष्यभर...,कंपनीसाठी काम केलं त्यात कंपनीच्या बिलीयन्स डाॅलरच्या फायद्यामध्ये तुमचेही खारीचे योगदान आहे, तर हे सगळे पॉईंट्स ऍड झाले यातून पेमेंट झालं. "

" You were destined to happen at right place at right time ! you got most efficient medical services in Qatar Heart Hospital !!
so im at wrong place
bye now"  Yamraj left...

रेड्याने रागाने हूंकार दिला, सवारी नाही कळल्यावर चिडला असावा, पटकन त्याचे तोंड फिरवून यमराज निघून गेला.

"या असचं कधीतरी आलात तर या जेवण झाल्यावर"....मी पुणेरी जोक मारला

अरे बापरे म्हणजे मी Smule वर काल गायलेलं duet song,

" हमे आना पडेगा,
  दुनिया में दुबारा "

कदाचित शेवटचं ठरलं असतं (black humour).
-----------------------------
12-April-2024 
दोन दिवसापासून बर वाटत नव्हतं दोन्ही खांदे आणि पाठीत खूप दुखत होतं आणि जरा fast चाललो की छातीत आणि पाठीत खूपच inflamation जळजळ होत होती.
 तसेच मी नाईट शिफ्ट ला गेलो.
मी मित्राकडे muscle pains साठी pain killer  मागितलं, त्याने painkillers गोळी दिली... काही आराम नाही, 
दोनदा vomiting झाली.

मित्राने antacid liquid दिलं.
तिस-या vomit मधे ते ही पडले
-------------------------------
13- April-2024

6:15 am नाईट ड्यूटी संपल्यावर रुमवर गेलो झोपलो.
6:00 pm ला Aster clinic ला गेलो
6:20 pm डाॅ ना भेटलो, पाठ,दोन्हि खांदे खूप वेदना, छातीत heaviness सांगितले, त्यांनी ECG काढायला सांगितला.
पुन्हा ECG काढला, चांगला नाही म्हणाले, डाॅ नी ambulance mobilize केली.

2 trained staff नी मला strecher वर झोपवून ambulance मधे चढवले,
aspirine दिली,
जिभेखाली  nitroglycerine spray मारला.
oxygen लावला.
ते radio वर Heart Hospital शी communicate करत होते.
-------------------------------------
13- April-2024

आठवा जरा,
'तनु वेड्स मनू' मूवी चा क्लायमॅक्स ...
माधवन बारात घेऊन जात असतो तेव्हा त्याचा रायवल त्याच्यासमोर येऊन त्याच्यावर बंदूक ताणतो तेव्हा माधवन हा डायलॉग मारतो 
"Theoretically मुझे डर लगना चाहिये लेकिन practically मुझे बिलकुल डर नही लग रहा है"

माझी स्थिती ही अशीच होती मला काय moves करायच्या त्या मी केल्या, त्यांना काहीतरी डेंजर दिसत होता आणि ते ॲक्शन मोडमध्ये आले त्यामुळे मी निवांत होतो आणि त्यांच्यावर सर्वस्वी सोपवून मी निश्चित, निर्विचार strecher वर पडलो होतो.
 
घरी काहीच माहीत नसल्याने पटकन एक selfi video family वर WA पाठवून दिला, काळजी करु नका असे म्हणालो.


Ambulance बूंगाट वेगाने Doha Heart Hospital ला आली (50 kms ?)

      Heart Hospital,Doha, Qatar
      image from internet with thanks



strecher सरळ operation theator मधे नेला. डाॅ नी कसली allergy आहे का विचारले, Concent form वर नाव व सही घेतली.

7:45 pm: procedure started. मनगटाजवळून Tiny cathator pass केला
(Standby arrangement म्हणून groin area जवळ दूसरा cathator तयार ठेवला )
3-4 डाॅ, 2 nurse काम करत होते, वैद्यकिय भाषेत एकमेकांशी संवाद सूरु होता. blockage size मोजली.
stent किती size असावा यावर पटकन एकमत झाले, baloon inflat डाॅ ओरडले
नंतर अजून एक stent टाकावा अशी चर्चा झाली, दूसरा stent टाकला. mission accomplished ✅

8:12 pm: strecher बाहेर आणला.

08:20 :Room 144 bed वर झोपवले, 
 ECG probes लावले portable device माझ्या खिशात ठेवले.
Now doctors /nurses monitored my ECG / BP / heartbeats from distance.
9:30 --10:00 pm : शांत झोपलो.
-----------------------------------------------
04:15 am : blood samples घ्यायला उठवले.

ECG, BP check ,blood sugar, 2D echo सारखे सूरुच होते. औषधे injections डाॅ चा follow-up सूरु होता.
--------------------------
आता खूपच छान वाटतयं, छातीतील जडपणा गेला, खांदे पाठ यांची असह्य वेदना नाहीशा झाल्या. 
feeling good. ☺️

--------------------------------------
कंपनीचा Sr.Managee भेटायला आले. 2 तास सुखदुखाच्या गप्पा मारत बसले, आजवर च्या कामातील commitment ची तारीफ केली, काही ही मदत मागा, लगेच करतो म्हणाले,
Retirement paper आधीच sign केलाय, लगेच release करा एवढचं म्हणालो.
तथास्तू.

----------------------------
बायको व मुलगी 24 तासात भेटायला आल्या,
(visa on arrival / discover Qatar group hotels )
feeling so homely and relaxed. 🥰
मित्र मैत्रिणींचे phones /WA mgs...get well soon wishes येताहेत
आम्ही भरुन पावलो.❤️🙏🏻
-----------------------------------------------------------
शायर म्हणतात.....

ये क्या हुआ, कैसे हुआ?
कब हुआ, क्यूँ हुआ?
जब हुआ, तब हुआ
ओह छोड़ो, ये ना सोचो


हम क्यूँ शिकवा करें झूठा?क्या हुआ जो दिल टूटा?
शीशे का खिलौना थाकुछ ना कुछ तो होना था, हुआ
ये क्या हूआ !
समझे ना....

# राजेश मोराणकर

-------------------------------------------------

-----------------------------------*****--------------------------------------

Sunday, 10 March 2024

नाटक Review : अ परफेक्ट मर्डर ....पाहीलेच पाहीजे, A must see Natak

 अ परफेक्ट मर्डर 

काल (10 मार्च 2024) संध्याकाळी टिळक स्मारक मंदिरमधे हे नाटक पाहीले.

impression : A must see Natak.

(मी हे नाटक दोन वर्ष चेस करत होतो,पण कंबख्त तारखा जुळत नव्हत्या, प्रयोग पुण्यात असायचा तेव्हा नेमका मी पुण्याबाहेर असायचो so long cherished Natak...आखिर मील ही गया !)


    सुबोध पंडे स्टेजवर का आणले नाही ??

भट्टी मस्त जमलीय....मजा आ गया.

अनिकेत विश्वासराव छा गये. अतिशय देखणा दिसलाय, स्टायलीश, वीथ किलर स्माईल उत्तम संवादफेक, जबरदस्त वावर स्टेजवर. 
❤️👌🏻👌🏻👍🏻👍🏻

कॅप्टन करमरकर सुबोध पंडे...परफेक्ट स्क्रीनटेस्ट, परफेक्ट पात्रनिवड ,उत्तम अभिनय आणि उत्तम रिअॅक्सन्स 100% न्याय. 👍🏻👍🏻
---------------------------------------------
मीरा (प्रिया मराठे)  शानदार लूक्स, देहबोली, उत्तम रिअॅक्सन्स, 👌🏻👌🏻
सर्व अटायर्स शोभून दिसले.पण एक इनोसंट लूक कॅरी केला....

'कितनी मासूम लग रही हो तुम,
तुमको जालीम कहे वोह झूटा है....'
-----------------------------------------------

इंस्पे. शिंदे योग्य काम केलय.

मीरा च्या लेखक मित्राची भूमीका अतिशय संयतपणे केली, विचारांची उडान दाखवत त्यांनी ते थ्रीलर लेखक का आहेत, खूपच convincingly portrate केले आहे. गुणी कलाकार. 👍🏻

या नाटकातला खरा हिरो "स्टोरी"आहे, आल्फ्रेड हिचकाॅच चा थ्रीलर म्हणजे अतिशय हूषारीने गुंफलेले कथानक आहे,हे मराठीत रुपांतर करण्यात लेखक 100% यशस्वी झालेत.

आता पुलीस डिटेक्टीव्ह इन्स्पेक्टर घारगे 
....पुष्कर श्रोत्री यांनी जेव्हाजेव्हा एंट्री घेतली तेव्हातेव्हा प्रेक्षकांचा ताबा घेतला, ग्रामीण भाषेचा लहेजा, सूक्ष्म तपशीलाची विचारणा, गावठी शैली तरीही अदब व ऐटीकेटस् ,इतरांच्या प्रायव्हेसीचा आदर, स्मार्ट ,निरीक्षण व घटना re-construct करण्याचा अट्टाहास हे सर्व पुष्कर यांनी छान दाखवले आहे.❤️👌🏻👌🏻👍🏻
 प्रसंगनिष्ट विनोद मस्त, त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद उस्फूर्त होता.

Before i forget,
lemme appreciate music / playback song...'सावल्या ssss
             प्रकाशातल्या सावल्या'
रहस्याचा effect ह्या ओळींनी गडद होत होता.

क्लायमॅक्स वेगळ्याच उंचीवर नेले त्यासाठी सर्व कलाकार/ लेखक / दिग्दर्शक /नेपथ्य/ प्रकाश, sound engineers असे सर्वाचे अभिनंदन.

एक उत्तम थ्रीलर अनूभव.
A must see नाटक
अ परफेक्ट मर्डर

नाटक housefull होते. 10 मार्च 2024.
प्रेक्षकांनी कडक टाळ्यांची पावती देत standing ovation दिली. दर्दी गर्दी.
myRating : ⭐⭐⭐⭐⭐
                      ❤️👏🏻👏🏻👏🏻👏🏻

-----------------------------------------------
हे नाटक नऊ वेळा (9 times) पहाणारे प्रेक्षक आहेत 😳😳 त्या जोडप्याचा परीचय करुन दिला गेला.
🤔👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
------------------------------------------

__राजेश मोराणकर
WA 0097455029913
rajeshmorankar@gmail.com

Thursday, 1 February 2024

Blood 'curdleing' exprience

 मराठीत काही English शब्दांचे काय प्रतिशब्द आहेत,मला माहीती नाही.

उदा. unlike .

Unlike sita, gita is tall.

तसेच दूसरा शब्द ,blood curdleing  म्हणजे रक्ताचे गोठणे किंवा शरिरात दौडणा-या रक्ताचे दह्यासारखे 'जमणे'.

--------------------------------------

एकदा मी घरापासून 3 दिवस दूर होतो.

आता नीट आठवत नाहीये, मोटरसायकलवर मी बदलापूर हून पुण्याला गेलो, काम झाल नाही म्हणून एक दिवस थांबलो, दुस-या दिवशीही काम झालं नाही म्हणून थांबलो, तिस-यादिवशी काम संपवून परत निघालो. यादरम्यान घरी निरोप कळवावा असे मला सुचले नाही. (कहर आहे )

इकडे घरी कल्पनाने एक दिवस वाट पाहीली, दुसरा दिवस अस्वस्थतेत गेला,नुसती जीवाची घालमेल, काही रोडअक्सीडेंट तर नाही... राजेश का नाही आला? का नाही आला? मन चिंती ते वैरी ना चिंती !

तिस-या दिवशी तिने धीर सोडला व अंबरनाथला बहीण शशीकडे गेली.

कल्पनेस धरवेना धीर, 

शरीर टाकले पृथ्वीवर, 

माझा राजेश सुकुमार,

दावा एकदा,पाहीन मी....

--------------------------------------------------

शशी बाल्कनी उभी होती....काय करावं बरं?

"अग कल्पना...तो बघ ,राजेश आsssss ला"

"खरच ?" म्हणत कल्यना धावत बाल्कनीत आली,

मोटरसायकल वरुन राजेशने चौथ्या मजल्यावर कल्पनाच्या 

चेह-याकडे पाहीले, तिला काय वाटलं ते शब्दात सांगणं अशक्य आहे,

"तपते दिल पर यूं गिरती है
तेरी नज़र से प्यार की शबनम
जलते हुए जंगल पर जैसे
बरखा बरसे रुक-रुक थम-थम
छम-छम, छम-छम, छम-छम, छम-छम"

"किसको बताएं कैसे बताएं
आज अजब है दिल का आलम
चैन भी है कुछ हल्का हल्का
दर्द भी है कुछ मद्धम मद्धम
छम-छम, छम-छम, छम-छम, छम-छम"

"होश में थोड़ी बेहोशी है
बेहोशी में होश है कम कम
तुझको पाने की कोशिश में
दोनों जहाँ से खो गए हम
छम-छम, छम-छम, छम-छम, छम-छम, रात"


------------------------------------------------


नवीन पिढीला हे कधीच कळणार नाही,

आम्ही असे जगलो !

मरता मरता....

आम्ही असे जगलो !!



-------------------------------------------------------



Saturday, 2 September 2023

गुरु ठाकूर ची कविता



whatsapp वर ली कविता पावली.
वाचून खूष झालो...
तरल कल्पनाशक्ती असलेले गुरु ठाकूर जबरदस्त गीते लिहीतात, वेगळी असतात आणि लगेच मनाला भीडतात,अपील होतात. 

कसं सुचतं यांना ?!

आपल्याला काही लिहीता येईल का!

मुख्य कल्यना कळली, श्रावणात जसा धूप छाव चा खेळ असतो,तसेच जिवनात ही सुख दु:ख येत असतात...

मी ही काही जुळवाजूळवी करायचं ठरवलं, 

आपसूक बालकवींची श्रावणमासी ही कविता आठवली,

मी खालील ओळी जुळवल्या....

#  राजेश्वर


--------------------------------------------------
डाॅ.पूजा वडगांवकरांनी खालील ओळी लिहील्या,
 



---------------------------------------------------------------------
बंधू संजय मोराणकर ने खालील ओळी लिहील्या,




गोव्यात जाईची पूजा

 whatapp मधे खालील पोस्ट पावली. copy n pasted with thanks to writer.

-----------------------------------------------------------

जाईची पूजा

गोव्यात श्रावणात जाईची पूजा असते. ह्या काळात खुप जाईची फुले फुलतात. नाजूक जाईची फुले फुलतात. देवस्थानात देवस्थानाबाहेर जाईचे गजरे, वेण्या दिसतात. ह्या वेण्या हे गजरे देवीला वाहिले जातात. श्री शांतादुर्गा, श्री महालक्ष्मी, श्री भगवती, नव दुर्गा, आर्या दुर्गा,म्हालसा, चंडिका ह्या देवी जाईच्या आभूषणाने नटून जातात. मुळातल्या सुंदर मूर्ती आणखीनच सुंदर दिसू लागतात. देवस्थाना बाहेर देवी साठी जाईच्या फुलांचे हार, वेण्या, गजरे देवीवर वहाणयासाठी आणले जातात. देवीचा पूर्ण गाभारा देवीच्या जाईंच्या फुलांनी सजतो. नाजूकशी लहानशी फूले नशीब काढतात आणि पानांवरून सुटून सरळ देवीच्या चरणांशी येतात.ह्या फुलांच्या राशीतून देवीचा मुखवटा लोभस दिसतो.ह्या फुलांचा मंद वास गाभारा भरून टाकतो. मुळातलेच देवळातले प्रसन्न वातावरण अधिकच प्रसन्न होऊन जाते. ही फुले तशी अल्पायुषी असतात ( फुलाना आयुष्य असतं नाही कोण म्हणत ) संन्ध्य काली ही फूल फुलूं लागतात जणू संध्याकाळी ही फुले देवीवर सुगंधाभिषेक सुरू करतात. ह्यांचा मंद सुवास जणू मंद आवाजात मंत्रोच्चार सुरू करतो. निसर्ग निसर्गाला ज्याने निर्माण केले त्याची पूजा सुरू करतो. निसर्गाला निर्माण केल्या बद्दल ती एक कृतदन्यता म्हणून आपले सर्वस्व त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वरावर ओवाळून टाकतो.उत्तर रात्री ही फूले लालसर होतात जणू येणाऱ्या सूर्यनारायण देवाच्या आगमनाची वार्ता म्हणून. जाईच्या फुलांचे नशीब खुप मोठे. देवीबरोबर त्यांचीही पूजा होते. पूजा देवीची होते आणि भाविक म्हणतात जाईची पूजा झाली.आयुष्य असेच असावे अल्पायुष्य असले तरी वाहून घेणारे जाईच्या फुलांचे जाईच्या फुलांसारखेच.

@केदार अनंत साखरदांडे

---------------------------------------------------------------

मी यावर जुळवाजुळव करुन एक कविता लिहीली


गोव्यात *जाईची पूजा*

झाला सुगंधी गाभारा

शब्द नाही आभारा !


जाईचे हार वेण्या गजरे

देवीचे रुप दिसे साजरे


लक्ष्मी,दुर्गा,म्हालसा,चंडिका

नटल्या अलंकारे जाई-मंडीता


आयुष्य जरी असे अल्पायुष्य

स्मरणात हे जाई-पूजा दृष्य


देवीवरी लक्षलक्ष जाई-वृष्टी

मानवाची आहे ही सौदर्यदृष्टी


# राजेश्वर

Saturday, 5 August 2023

Theatre Review : marathi Natak होल बाॅडी मसाज , overall rating ⭐⭐⭐⭐⭐ A must see Natak.

 नाटक रीव्हू

होल बाॅडी मसाज

लेखक: डॉ. हर्षवर्धन श्रोत्री

दिग्दर्शक: किरण यज्ञोपवीत

कलाकार: गिरीष कुलकर्णी ,



 overall rating  

आम्ही आसनस्थ झालो.

काही सेलीब्रीटीज सुद्धा आलेत असा अंधारात भास झाला. (आदीनाथ कोठारे ,राहूल रानडे).



मायकल अँजेलोने मानवी बॉडी ची (अँनाटोमी कळण्यासाठी) बॉडीचे डिसेक्शन केलं होतं,कारण मसल कळल्याशिवाय माणसाच्या पोर्ट्रेट चित्रामधे जिवंतपणा येत नाही, तसं तर स्वामी दयानंद यांनी पण अंतरंग कळण्यासाठी डेड बॉडीचं डिसेक्शन केले होते. आपल्या नाटकाचा हिरो पण एक चतुर्थ श्रेणी असा वॉर्डबाॅय आहे की जो डाॅक्टरांच्या आदेशाने डेड बाॅडीचे डिसेक्शन करतो.


माँर्गमध्ये काम करताना डेड बॉडीची असह्य दुर्गंधी सहन करण्यासाठी अपरीहार्यपणे दारूचे सेवन केले, आणि ही दारू अति झाल्यामुळे मेंदू पण कन्फ्युज होतो आणि सत्य काय आणि कल्पक काय अशी भ्रामक स्थिती निर्माण होते आणि त्यात डिसेक्सन करणारा जर बॉडीच्या प्रेमात पडला आणि परत भ्रामक सिझोफ्रेनिक कंडिशन मध्ये त्याने विचार केला तर काय होऊ शकतं....याचा अचाट नाट्यप्रयोग आहे.


हे 'माईल स्टोन' नाटक आहे आणि पाहताना असं वाटत जायचं की असं काही भारतीय रंगभूमीवर आलचं नाही,आपण काहीतरी निर्माण होणारा इतिहास बघतोय कारण पूर्वी जसं सखाराम बाईंडर हे नाटक गाजलं होतं आणि त्यावर कोर्टाची बंदी वगैरे सगळे त्यावेळी झालं होतं आता त्यामानाने आपण जरा निर्ढावलो आहोत,त्यामध्ये बरीचशी आपली मनस्थिती पण समावेशक झालीय आणि टीव्हीवर ओटीपी सिरीयल बघून आपण पण बरेच आता तयार झालो आहोत तर हे एक बोल्ड नाटक आणि पाहिलेच पाहिजे असे नाटक आहे.


कथेचा कॅनव्हास खूप मोठा आहे नाटक काही बोल्ड संवादाकडून चक्क महाराजांच्या अभंगवाणी पर्यंत असं मोठा झोका घेतं.


स्टोरी सांगण्याचं पाप मी करणार नाही, कुठलाही रसभंग किंवा सस्पेंस घालवणार नाही.

My appeal,

please go to the Box in next opportunity and watch 'full body massage'

"It will broaden your senses!"


script : dynamic, fast, happening, bold and spiritual.अशी ही incredible story चे श्रेय डॉ. हर्षवर्धन श्रोत्री यांना जातं. मी त्यांना भेटून हे इतकं उत्कट झालय की सत्यकथा असल्यासारखं वाटतयं असं म्हटलं, त्यांनी होकारार्थी मान डोलावली.

direction: किरण यज्ञोपवीत दृष्यअदृष्य पणे प्रत्येक सीन मधे वावरतात, पात्रांची entry-exit, कुणी किती पावलं कुठल्या दिशेने चालायचं, spot light कधी, music...एकतारीने स्वर...कधी वाढत, कधी diminishng कधी जायचे, प्राॅपर्टी चा minimum उपयोग हे व लक्षात न आलेले अनेक पैलू हे दिग्दर्शकाचे यश आहे.

stage light and dark: impressive 👍🏻

casts : very appropreate portray by all.👍🏻👍🏻

acting :सर्वांचीच कामे उत्तम , 

बायकोच्या भूमिकेत रुचिका भुजबळ यांनी चांगली छाप पाडली आहे.

लीली ची स्वप्नमय भूमिका रिद्धी खांडरे ( /खंडारे) हिने अप्रतिम केली आहे, खूप challenging आव्हानात्मक bold आणि अमर्याद patiance (आपली entry येईपर्यंत शांतपणे AC च्या थंडीत पडून रहाण्याचे धैर्य कुठून आणतेस रिद्धी?!) , तिचा अभिनय, looks फार विलोभनीय आहे...deserves loud applaud 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻.

श्रीकांत यादव  (रफिक खाटीक)  यांचा अभिनय एका सीनमधे , गिरीष यांच्या 'वरचढ' (अक्षरश:) ठरला, पाॅवरफूल presence...खूप talented .

गिरीष कुलकर्णी छा गये, संवाद, मोनोलाॅग्ज (स्वगत), देहबोली आणि भूमीकेचे detailing दाखवणे अगदी कहर आहे.  big congratulations.

अशक्य,अचाट,अचंबीत....झालो आहे 🙏🏻

---------------------------------------------------

Natak (Theatre)

WHOLE BODY MASSAGE

Credits

Produced by: Maharashtra Cultural Centre, Pune

Cast and Crew:

Writer: Dr. Harshawardhan Shrotri

Director: Kiran Yadnyopavit

Music: Gandhar Sangoram

Set design: Kiran Yadnyopavit

Light design: Sanket Parakhe

Costumes: Smita Taware

Production team: Siddhant Basutkar, Amol Tapare

Backstage Management: Manaswi Pendharkar, Gayatri Tambe-Deshpande and others


Cast


Vijay Shinde: Girish Kulkarni

Rafik: Shrikant Yadav

Tukaram: Abhijeet Dhere


Lilly: Riddhi Khandre


Vijay’s wife: Ruchika Bhujbal


Dr. Aniruddha Rao: Kiran Yadnyopavit


Head Sir: Vinayak Lele

Danny: Dnyanaratna Ahivale

Ramdin: Amol Tapare


overall rating  

------------------------------------------------------

--राजेश मोराणकर  rajeshmorankar@gmail.com


 


Sunday, 9 July 2023

Salute to Mumbai Police🙏🏻🙏🏻🙏🏻 Salute to Vivek Phansalkar Police commissioner of Mumbai. 🙏🏻🙏🏻🙏🏻

पेपर वाचतांना पुढा-यांच्या या पार्टीतून त्या पार्टीत मेंढरांसारख्या धावणा-यांच्या  बातम्या, भाई भतिजा वाद, पक्ष आपल्या मुलाला,मुलीला च कसा मिळेल या काळजीत नेतेमंडळी, एकमेकांवर चिखलफेकीचा वृत्तांत लिहीणारे पाळीव पत्रकार,यात एका सकारात्मक बातमीने लक्ष वेधले.

आणि ही एक दिवसाची बातमी नाही,तर मुंबई पोलीसांनी वर्षभर दर शनिवारी, महिलांच्या तक्रारी ऐकल्या,नोंदवल्या, त्या केसेस मधे लक्ष घातलं.

-------------------------------------------------------------------------------------

copy and paste from esakal

   (धन्यवाद सकाळ वृत्तसेवा)

Mumbai Police : मुंबई पोलिसांनी केला हजारो महिलांच्या तक्रारीचा निपटारा

Published on : 9 July 2023 10:13 PM
By
सकाळ वृत्तसेवा
    




मुंबई - आजही समाजातील अनेक अत्याचार पीडीत महिला तक्रार दाखल करायला पुढे येत नाही. त्यामुळे अनेक गुन्हे हे रेकॉर्डवर येत नाही. विशेषता पोलिस ठाण्यात जायला महिला कचरतात. ही बाब लक्षात घेवून मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दर शनिवारी महिलांसाठी तक्रार निवारण दिनाचा उपक्रम सुरु केला. या उपक्रमाला एक वर्ष पुर्ण झाले असून महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून आतापर्यत हजारो महिलांच्या तक्रारीचे निवारण झाले आहे. शिवाय महिला आणि पोलिसांमध्ये विश्वासाचे नाते तयार होत आहे.

शनिवारी मुंबईतील सर्वच्या सर्व ९३ पोलिस स्टेशन महिलांनी गजबजून गेल्याचे चित्र असते... निमित्त होते महिला तक्रार निवारण दिनाचे. एकट्या शनिवारी मुंबईच्या सर्व पोलिस स्टेशनमध्ये एकुण १७०६ तक्रारदार हजर होते. त्यापैकी ९११ महिला तक्रारदारांचा समावेश होता. महिलांच्या अडचणी समजून घेण्यासाठी संबधित पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षकांसह सर्व अधिकारी उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे या महिलांसोबत संवाद साधून त्यांच्या शंकेचे निरसन केले जाते.

विवेक फणसाळकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाची सुत्रे घेतल्यानंतर हा उपक्रम तातडीने सुरु केला होता. हळूहळू या उपक्रमाच्या निमीत्ताने पोलीस ठाण्याबद्दलची महिलांमधील भिती आता कमी होताना दिसत आहे. या उपक्रमाने घडवून आणला हा सकारात्मक बदल असल्याचे पोलीस आय़ुक्त विवेक फणसाळकर यांचे म्हणणे आहे.
महत्वाचे म्हणजे हा उपक्रमावर वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे काटेकोरपणे लक्ष असते.या दिवशी प्रत्येक पोलिस ठाण्याला विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्तासह प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्तव परिमंडळप पोलीस उप आयुक्त भेटी देत असतात.

तक्रार निवारण दिनाचा उद्देश
१.महिलांच्या अडचणी समजून घेणे
२. प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करणे
३.महिलांच्या तक्रारीवर तातडीने कार्यवाही
४.महिला- पोलिसांमध्ये विश्वासाचे नाते तयार करणे
५. पोलिस तक्रार निवारण कक्ष एक्टीव,अपडेट ठेवणे
६. महिलांनी केलेल्या तक्रारीची अपडेट माहिती देणेआयुक्तांच्या कल्पनेतून सुरु झालेल्या या उपक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या निमीत्ताने मोठ्या संख्येने महिला ,पोलिस ठाण्यात येत आहे. संबधित पोलिस अधिकारी संवाद साधून त्यांच्या तक्रारीचे निवारण करत असून यावर वरीष्ठांचे लक्ष असते.

- बालसिंग राजपूत, पोलिस उपायुक्त, गुन्हे
-------------------------------------------------

एका प्रसिद्ध गाण्यात किरकोळ बदल करुन मला हे म्हणावेसे वाटले,

 सुनना सुनना, तू तू सुनना....

आसमान को धरती पे लाने वाला चाहिएँ,
झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए,   
गिरते को बढ़के उठानेवाला चाहिए,               
दुखीयन को FIR लिखानेवाला चाहिए !!  

धन्यवाद मुंबई पोलीस ,सॅल्यूट 🙏🏻🙏🏻🙏🏻

धन्यवाद, बालसिंग राजपूत, पोलिस उपायुक्त, गुन्हे,

धन्यवाद, विवेक-जी फणसळकर साहेब 

🙏🏻🙏🏻🙏🏻


sunna sunna tu tu sunna.....

ho aasmaan ko dharati pe laane waala chaahiye,

jhukati hai duniya jhukaane waala chaahiye,

ho girate ko badhake uthaanewaala chaahiye,

bhule ko rasta dikhaanewaala chaahiye

Dukhiyan ko FIR Likhaanewaala chaahiye...


Salute to Mumbai Police🙏🏻🙏🏻🙏🏻

Salute to Balsingh Rajput, Crime.🙏🏻🙏🏻🙏🏻

Salute to Vivek Phansalkar Police commissioner of Mumbai.🙏🏻🙏🏻🙏🏻

----------------------------------------------------------

more....

This story is from September 18, 2022

https://www.google.com/amp/s/m.timesofindia.com/city/mumbai/mumbai-police-hold-special-meetings-to-hear-women-victims-of-crime/amp_articleshow/94274885.cms

-----------------------------------------------------------