सुरवात एका सामान्य माणसाची गीतलेखक बनण्याची ....
मला वाटत दोन वर्षांपूर्वी मी एकदा खूप कंटाळलो होतो ,मला काहीतरी असा छंद पाहिजे होता ज्यात मी स्वत:ला हरवून जावे आणि कामाच्या स्ट्रेस चा विसर पडावा , वाचन किती करावे ,गेली अनेक वर्षे वाचतोच आहे पेपर मधील सुमार दर्जाची शब्दकोडी पण मजा देत नव्हती .भ्रष्टाचार ,अत्याचार च्या बातम्या वाचून वीटलो होतो. मन काहीतरी सकारात्मक /क्रियेटीव्ह /सजर्नशील असा आउटलेट शोधत होते.
आणि अचानक माझी नजर जगदीश खेबुडकर लिहित असलेल्या (सकाळ) कॉलम कडे गेली आणि मन प्रसन्नतेने भरून गेले.त्यात खेबुडकर त्यांनी गाणी कशी लिहिली ,विचार कसा केला ,त्याआधी इतरांनी लिहिलेल्या गाण्यांच्या ' मीटर ' चा अभ्यास कसा केला वगैरे लिहिले होते, मी दर आठवड्याला येणाऱ्या त्या सदराची उत्सूकतेने वाट पाहू लागलो .
नंतर त्यापुढे जावून आपण त्या गाण्याला एक "नवा अंतरा " लिहू शकतो का ( ! ?) हा विचार मनात आला.
( भाऊ साहेब पाटणकर म्हणतात तसे,
सांगेल काही भव्य ऐसी ,
शायरी माझी नव्हे,
तो कवींचा प्रांत ती,
पायरी माझी नव्हे.
माझ्या अल्प समजाप्रमाणे,
कवी : कवी हा सर्व श्रेष्ठ असतो, तो कुणाचा मोताझ /बांधील नसतो, कवी अदभूत कल्पनांशी खेळत असतो ,शब्दांशी खेळत असतो.प्रभावीपणे नवरस निर्मिती करू शकतो.
गीतकार: जरी दिलेल्या वेळ, चाल,मीटर ,स्टोरीलाईन यांच्या बंधनात काम करीत असला तरी गीतकार हा ग्रेट असतो.त्याला छंद मात्रा यांचे ज्ञान असते,संगीताचे ज्ञान असते,विशेष म्हणजे भारतीय संस्कृती, तत्वज्ञान यांचा व्यासंग असतो.स्टोरी तील पात्रे आलेल्या परिस्थितीत कशा मानसिकतेत असतील ते अंतर दृष्टीने पाहण्याचे कसब त्यांच्यात असते.
गीत लेखक : हा शब्द फारसा प्रचलित नाही. song writer चे मी शब्दश: भाषांतर वापरत आहे. )
तर आपण गाण्याला एक "नवा अंतरा " लिहू शकतो का , हा विचार मनात आला.
आधीच ठरवून टाकले कि गाण्याच्या "थीम"चा विचार करायचा ,यमक वगैरे हा नंतर चा प्रश्न आहे.
मी त्यांच्या या गाण्याचा विचार करू लागलो ,
सत्य शिवा हून सुंदर हे
original इथे मोल ना दामाचे
मोती होतील घामाचे,
सरस्वतीच्या प्रेमाचे,
प्रतिक रम्य शुभंकर
सत्य शिवा हून सुंदर हे
थीम : सिनेमात शाळा बांधतांना घेतलेले हे एक 'टाईम सॉंग' आहे. लक्षात घेतले संस्कृत शब्दांचे प्राबल्य आहे.
विचार : ओघाने विचार आला कर्मवीर पाटील यांचा ,स्वत: जास्त शिकले नव्हते तरी मुलांना शिकवण्याचा ध्यास घेऊन चालत ,मिळेल त्या वाहनाने ते देणगी गोळा करण्यासाठी खूप फिरले.
मग ठरले याच विचारावर नवा अंतरा लिहायचा ,यात माझे योगदान असावे म्हणून कर्मवीर च्या ऐवजी "कर्मयोगी " या शब्दाची योजना केली .
स्फूर्ती वगैरे काही नाही, ठणठ्णीत जुळवा जुळवी करून हा अंतरा लिहिला,
कुणी कर्मयोगी धजतो ,
ज्ञान तपास्तव तो झिजतो
जरी अशिक्षित, निज तो
ज्ञान-सहाय्य निरंतर हे
सत्य शिवा हून सुंदर हे
आता हे लिहिणे फ्लूक नाही हे सिध्द करण्यासाठी खेबुडकरांच्या पुढच्या गाण्याकडे वळलो ,
देवापुढे मानुस पाला-पाचोळा र
थीम : देवापुढे माणूस यत्किंचित असतो.
विचार: देव वगैरे म्हटले असले तरी त्यापेक्षा 'निसर्ग' जास्त संयुक्तिक वाटले.निसर्गाच्या प्रकोपापुढे माणसाचे काही चालत नाही ,वादळे ,भूकंप, सुनामी ....जपान.जपान्यांची कष्टाची वृत्ती, महा युद्धातून सावरून ,अथक मेहेनेतीतून संपन्नता ..सुनामी... लक्षात घेतले की गाण्यात ग्रामीण शब्द आहेत.मग लिहिले,
कष्ट इमानाने त्याने गरुड झेप घेतली
शिरीमंती राहनीची 'गारूड' ठेप घेतली
एका सुनामीने झाला देश पांगळा र
देवापुढे मानुस पाला-पाचोळा र
( फिनिक्स एवजी गरुडझेप, रिच लाईफ स्टाईल साठी इतरांच्या मनावर 'गारूडपडणारी ठेपअसे काहीतरी लिहिले)
या लिहिण्यामुळे मनाला चालना आणि खूप उभारी मिळाली
सुरवात तर झाली,आता छंदच लागला ,पुढचे गाणे ,
राजा ललकारी अशी दे ,हाक दिली साद मला दे
थीम : शेतकर्यांचे जीवन /कामाचे साहचर्य
विचार: ते लिहिणेच काय ज्यात सामाजिक जाणीव नसेल ,शेतकर्यांचे दलालांकडून होणारे शोषण आणि अमानुष स्वस्त भावाने त्यांच्या शेतमालाची खरेदी करण्याची मानसिकता याचा निषेध करण्यासाठी लिहिले,
आठवते गेल्या वर्षी दिन-रात कष्ट झालं ,
कमावले जे शेतात, बाजारात नष्ट झालं,
काय उलटा कायदा ,कदी दिसलं फायदा ,
भाव कांद्याला मिळू दे,
हाक दिली साद मला दे, राजा ललकारी..
असेच खेबुडकरांचे खूप वाजलेल गाणे ,
दाम करी काम येड्या ,दाम करी काम
थीम : पैशाचे जीवतात स्थान !
विचार:या विषयावर अनंत शेड्स आहेत, मी पाहिलेय , नाईलाजाने नोकरीसाठी वेगवेगळ्या गावात राहणारी जोडपी,घरदार जमीन जुमला झालापण त्यांचा राहून गेलेला सहवास !
ह्या कवडी दमडीपाई नवरा बायको र्हातात दूर,
घडी भरचा नाही सहवास,
पैशाला आला पूर,
जगनं गेल र्हाऊन होता ,
ह्या पैशाचा गुलाम हो ,
दाम करी काम येड्या ,दाम करी काम
नंतरचे जगदीश खेबुडकरांचे गीत माझे(आणि सर्वांचेच) अतिशय आवडते ...
धुंदी फुलांना धुंदी कळ्यांना ,
शब्दरूप आले मुक्या भावनांना.
(यावेळी फार दूर गेलो नाही ,लग्ना आधी घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती , नंतर खूपच बरे दिवस आले म्हणून तिला अर्पण करून लिहिले,
तुझ्या संगती जीवनी अर्थ आला,
मन रंगती लोचनी स्वप्नमाला ,
जिणे आज माझे तुझा नजराणा ,
शब्दरूप आले मुक्या भावनांना.
खेबुडकरांपासून सुरवात करून मी माझी मुक्त मुशाफिरी हिंदीतही चालू ठेवली.(उद्देश स्वत:ला आनंद मिळण्यासाठी नवा अंतरा लिहिणे आणि स्वत:कडेच ठेवणे )
मेरी दुनिया है तुझ में कही,
तेरे बिन मै क्या कुछ भी नहीं
original पलकोंपे तेरे रूप का सपना सजा दिया
पहली नजर में ही तुझे अपना बना
है यही आरजू ,हर घडी बैठी रहो मेरे सामने
अब तो जहा भी मै चलू,मुझे तू ही तू मिले
तुझ से शुरू हो दिन मेरा ,तुझ से ही तो ढले
क्या यही,ख्वाब है, कह रही कुछ मुझे, जुल्फे सवारे हुवे
मेरी दुनिया है तुझ में कही, तेरे बिन मै क्या कुछ भी नहीं
एक जुने सुंदर गाणे
कही ये वो तो नही
गीत :कैफी आझमी ,चित्र :हकीकत ,लता .
original शक्ल फिरती है निगाहो में वोही प्यारीसी
मेरी नस नस में मचलने लगी चिंगारी सी
छू गई जिस्म मेरा ,किसके दामन की हवा
कही ये वो तो नही
माझी addition
इतने बरसोमे खयालोंमे न कोई दुजा
इतने बरसोमे मेरे दिल ने तुम्ही को पूजा
काम आयी है यहा,मेरी जन्मोकी दुआ ,
कही ये वो तो नही
पुण्याच्या जर्मन बेकरी स्फोट प्रकरण अजूनही सुटले नाही ,वर्ष स्मृतीच्या फोटोखाली पेपरने कवी 'ग्रेस' यांच्या ओळी उर्धृत केल्या होत्या ,
'भय इथले संपत नाही '
मी वहीत श्रद्धांजलीपर ओळी लिहिल्या ,
हे वर्ष पुरे स्फोटाचे,
तेजात उजळती चेहेरे,
चाकर सारे पोटाचे,
नव वर्ष नवे ते मोहरे,
भय इथले संपत नाही.....
(अर्थ प्रत्येक जण लावेल तसा.)
कधी कधी आपली पायरी विसरून मी मराठीतल्या चिरंतन काव्य-शिल्पाला हात लावतो (या बाबत कधीकधी मी व.पु.काळेंच्या एका कथेत आलेला 'equality complex ' हे तत्व वापरतो.. )
हिरवाईची अथांग हि वळणे ,
अन वळणाची वाट,
कुठे नेई भारावल्या शरीरा
श्रुती ऐकती 'थाट',
क्षणोक्षणी नव चलतचित्र हे
अन थरारे देह सारा ... .
श्रावणात घननिळा बरसला
किंवा आरती प्रभूंचे अद्वितीय गीत,
(हृदय नाथाचे अदभूत संगीत लाभले)
ती येते आणिक जाते
येताना कधि कळ्या आणिते
अन् जाताना फुले मागते
येताना कधि अशी लाजते
तर जाताना ती लाजविते:
कळते काही उगीच तेही
नकळत पाही काहीबाही,
अर्थावाचुन असते 'नाही', 'हो', ही म्हणते.
addition साठी थीम : आरती प्रभूंची 'ती' म्हणजे प्रतिभा त्यांना आपल्यातून दूर घेऊन गेली !
माझी addition
येतांना कधी अशी वागते,
चल संगती , कशी मागते,
आता नाही फिरून येत ,
घेऊन जाण्या दुरून येत,
चल पुढे तू ,येते मागुनी मी ही म्हणते...
गुरु ठाकूर माझा आदर्श आहे (त्यांनीही सुरवातीला जुन्या गाण्यात खुप नवीन अंतरे जोडले होते असे वाचले )
यमक बद्दल बोलायचे तर जेव्हा गीतकार उच्च दर्जाला पोचतात तेव्हा यमकाची सुद्धा फिकीर बाळगत नाहीत, उदाहरण म्हणून
आनंद बक्षी यांचे हे गाणे ,
वो अचानक आ गई, यूँ नज़र के सामने
जैसे निकल आया घटा से चाँद
चेहरे पे ज़ुल्फ़ें, बिखरी हुई थीं
दिन में रात हो गई
एक अजनबी हसीना से...
रियाजाचे महत्व गायकाना असते तितकेच सर्वांनाच असते, पूर्वीचे कवी संस्कृत भाषांतराचे काम हाती घेत जेणेकरून नवीन शब्द, कल्पना हाताळल्या जातील व्यासंग वाढेल , मग नवीन गीतलेखकाने काय करावे ,
मी भावाला जो संगीत जाणतो एक इ-मेल लिहिला होता,
(( संजू,
परवा रफीचे गाणं ऐकलं ,
मी इक राजा हुं ,
तू इक रानी है
प्रेमनगरकी ये इक सुंदर
प्रेम कहानी है
खूप सोपं ,बाळबोध आणि तरीही सुंदर गाणं .
मला वाटतं छंद म्हणून self declared गीतलेखक बनण्यासाठी हे गाणं आदर्श आहे.
जर नवीन अंतरे लिहायचे असतील तर 'थीम' समजून घेणे खूप आवश्यक आहे.
'थीम' : हिरो हिरोइन ला त्याचे प्रेम प्रपोज /पेश करतोय पण ती नासमझ आहे व तिच्या लक्षात येत नाही.
ओरिजनल ... आनंद बक्षी साहेबांनी सहज लिहिला आहे ,संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल .
मन मेरा इक महल हो जैसे
तू इसमें रहती है ऐसे
जैसे सीप में मोती है
सागर में पानी है
मैं इक राजा हूँ...
मला वाटत या गाण्या चे असंख्य अंतरे लिहिले जावू शकतात
कहानी है ' साठी यमक शोधून मग आधीच्या ओळी manupulate करून ठोकून मीटर मध्ये बसवायचा प्रयत्न आपण करू शकतो .
नमुना १ : 'जवानी' हा शब्द जुळतोय , हिरोइन अल्लड आहे असे मानले तर ,
कैसी अल्ह्ड ना जाने
आयी जवानी है
मग आधीच्या ओळींसाठी काही नैसर्गिक known pairs चा उल्लेख करू शकतो ,जसे,
धरती पर आकाश का साया
xxxxxxxxxxxxx माया /पाया /गाया वगैरे
धरती पर आकाश का साया
नदियोने सागर रचैया
कैसी अल्ह्ड है ना जाने
आयी ये जवानी है
मैं इक राजा हूँ...
नमुना २: पौराणिक
श्याम कि होती ही राधा
मन मेरा खोया ही आधा
फिरसे मुरली कि धूने
जग को सुनांनी है
मैं इक राजा हूँ...
किंवा
राधा के मन में है कन्हैया
गोपीके संग रास रचैया
राधा श्याम के प्रेम कमल
जमुना में बहाने है
मैं इक राजा हूँ...
नमुना ३: राजकीय (विडंबन )
पोलिटिक्स में करते है युती
वरना पड सकती है जुती,
जैसे मैं हुं राम और
तू जेठमलानी
मैं इक राजा हूँ...
नमुना ४: आय टी वाल्यांनी काय करावे ,
मौसम है एक wifi जैसा
रूप तेरा है hifi ऐसा
भेज रहा हु file तुझे
download करानी है
मैं इक राजा हूँ...
नमुना ५: टपोरी...ते राजघराण्यातले असतील तर टपोरी का बोलतील ?
सुनती ही मैने क्या बोला
तू बोतल ही मैं हु कोला
कैसे बनती है रे तू
कितनी शाणी है
मैं इक राजा हूँ...
नमुना ६: फिलोसोफिकल
जन्मोसे ये गीत है गाया
बदले नाम बदली ये काया
वक्त ने लाया सामने ये ,
क्या मेहेरबानी है
मै इक राजा हु ......
नमुना ७:मेडिकल student मैत्रिणीला काय म्हणेल ?
होर्मोन्स का ये खेल है सारा ,
केमिकल लोच्या है न्यारा ,
झटक दे 'thermometer' तू
राउंड लगानी है .
मैं इक राजा हूँ... ))
सध्याचे नवीन गीतकारांची स्टाईल हि खूप मोहक वाटते,
Singer(s) : Neeraj Shridhar
Lyricist / Songwriter : Irshad Kamil
Music Director / Composer : Pritam Chakraborty
दिल कि तख्ती पर हु लिखती
इश्का इश्का
जग क्या जाणे दिल को मेरे
इश्का किसका
रब यार गलेसे सार मेरे
मुझे क्या पर्वा इस दुनिया कि
तू जीत मेरी जग हार मेरी
मै हू ही नही इस दुनिया की.
तुम्ही दिन चढे
तुम्ही दिन ढले
तुम्ही हो बंधू ,
सखा तूम्ही
addition ....
इस जमाने को पडेगा
झुकना झुकना,
चांद सूरज को पडेगा
रुकना रुकना
कुछ और पिलादे ओ साकी
मुझे क्या पर्वा इस दुनिया कि
तुझे जो पाया ,रब को पाया ,
मै हू ही नही इस दुनिया की
तुम्ही दिन चढे
तुम्ही दिन ढले
तुम्ही हो बंधू ,
सखा तूम्ही
------------------
चित्रपट / Film: Happy New Year
संगीतकार / Music Director: Vishal-Shekhar
ह्या गाण्याच्या शब्दांच्या मी प्रेमातच पडलोय,
ओ मनवा लागे लागे रे सांवरे,
लागे रे सांवरे
ले तेरा हुआ जिया का,
जिया का जिया का ये गाँव रे
मुसाफिर हूँ मैं दूर का
दीवाना हूँ मैं धुप का
मुझे ना भाए,
ना भाए ना भाए
छाँव रे
मन के धागे,
ओ ऐसी कैसी बोली
तेरे नैनो में बोली
जाने क्यों मैं डोली
ऐसा लगे तेरी हो ली
मैं, तू मेरा
तूने बात खोली
कच्चे धागों में पिरो ली
बातों की रंगोली
से ना खेलूं ऐसे होली
मैं ना तेरा…
ओ किसी का तो
होगा ही तू
क्यों ना तुझे
मैं ही जीतूं
खुले ख़ाबों में
जीते हैं,
जीते हैं बावरे
मनवा लागे....
( काम हो रहा है, त्या दर्जाचं सुचतं नाहीये, आपल्याला काहीचं घाई नाहीये,
appeal to readers...वाचक हो काही सुचवता का ?)
माझ्या ताजमहालाला तुमच्या 'विटा ' लावु नका असे कोणीतरी ( अत्रे ?) addition घेणाऱ्या नाट्य कलाकाराला म्हटले होते, किंवा असे हि म्हणता येईल की कशाला त्यांच्या भरजरी 'शालूला' तुमची ठिगळे लावता ...पण काय करू लहान बालक सुरवातीला चालतांना मोठ्यांचाच हात धरते ना .
काही असो, सुरवात तर केली आहे.
राजेश मोराणकर
No comments:
Post a Comment