Tuesday, 17 February 2015

बाल साहित्य (1) : गणपती बाप्पा more द्या

गणपती बाप्पा more  द्या

दरवर्षी प्रमाणे घरात गणपतीत उत्साहाचे वातावरण होते. आईने व ताईने घराची छान साफसफाई केली . बाबा पेपर वाचत बसले होते तोच आईने त्यांना कामाला लावले .
'सोफ्यावर खूप धूळ साचली आहे , मला मेलीला तो व्ह्याक्युम चालवता येत नाही ना ,नाहीतर कशाला ….'
बाबांचा चेहरा त्रासिक झाला पण छोटा राजू बघतोय हे पाहिल्यावर लगेच खोटा खोटा उत्साह दाखवीत बाबा उठले ,तरी राजू ने वाक्य पूर्ण केलेच,
'नाहीतर कशाला तुमच्या पाया पडले असते'

दादा रंगीत कागदाची आरास बनवीत होता,मधेच ,'राजू, बघ हे थर्मोकोल चे चक्र फिरते का बघ ' म्हटल्यावर राजूने बॅटरी घालून ,बटन ऑन करून चक्र फिरवून पहिले. खरे तर दादा हे करू शकला असता
पण तो जर राजू ला प्रमोट करत होत.
'दादा ,डेकोरेशन भारी झालाय हं ' ताई मस्का मारत होती .
'आता स्कॉलर राजू कुठल्या विचारात पडला आहे' ताई ने विचारले
'ताई,आपल्याला गणपती इको फ्रेंडली कराय्चना ,मग थर्मोकोल का वापरतोय आपण ' इति राजू
'दादा ओवर तो यू ' ताईने पळवाट काढली .
हेच हेच बघायचे होते ,तुझ्या लक्षात येते का नाही , पास झालास हा राजू , ठरले पुढच्या वर्षी थर्मोकोल कटपी ' दादा म्हणाला

इको फ्रेंडली  इको फ्रेंडली म्हणून राजू ने घरात सगळ्यांचे डोके खाल्ले होते, म्हणून गणपती प्लास्टर ऑफ पॅरीसचा ना आणता ,शाडू मातीचाच आणला होता  आणि तो हि एका वर्कशॉप ला  जाऊन ताईने हाताने बनविला
होत. दिसत होता थोडा ओबडधोबड पण तरीही राजू खुश होता  त्यात आजी आजोबा आले म्हणून आणखी खुश .

'यावर्षी तरी आरत्या पाठ करा रे' .ते बाबांकडे पाहत म्हणाले. इतकी वर्षे झाली तरी बाबा आरतीचे पुस्तक पाहत आरत्या पुटपूटत .
'चांगले खणखणीत आवाजात म्हणारे' आजी म्हणाली

'बाबा मोरया म्हणजे काय' राजू पिडायला लागला
गणपतीची आरती कुणी रचली माहिती आहे का ? बाबांनी सेफ झोन मध्ये यायचा प्रयत्न केला .
'माहित्ये,रामदासांनी .दास रामाचा वाट पाहे मध्ये नाही का त्यांनी सिघ्नेचर ठेवलीय, पण मोरया का म्हणायचे ?' राजू
'दादा सांगून टाक रे त्याला ' बाबांनी टोलवला
' हं ,बघतोय,विकिपीडिया मध्ये पण हा राजुपिडीया जर सवड देईल तर ना ,किती पिडतोय' दादा मोबाइल मध्ये पाहत म्हनाला .

व्हाय मोरया ? राजू सोडत नव्हता ,आजी मध्ये पडली अरे मोठी माणसं सांगताहेत ना, मग म्हणायचे ,अरे हा श्रद्धेचा विषय आहे .
'बर का राजू , अरे मोरया गोसावी म्हणून मोठे सिद्धपुरुष होऊन गेले चिंचवडला ,ते मोठे गणेश भक्त होते, म्हणून मोरया बर का ' आजोबा म्हणाले
'या या समथिंग तसेच काहीतरी दिलेलं आहे नेट वर' दादा म्हणाला

ओके अॅग्री , ते ग्रेट होते पण मग रामदास स्वामी पण ग्रेट होते त्यांनी आरती पण रचली ,ते भारतभर फिरले, बलोपासना केली ' राजू द स्कॉलर
'मग काय ' बाबा म्हणाले
'मग ,गणपती बाप्पा स्वामी का नाही ?'राजू

नाही ,चांगले आहे ,नवविचार चांगले आहे आजोबा इकडेतिकडे पाहत म्हणाले
पण आपल्या सर्वांनाच आता मोरया ची सवय  झाली ना ,त्याला हे rhyming नाहीये ,आजोबांनी नवा मुद्दा काढला .

तेवढ्यात टीव्ही वर 'दिल मांगे मोर 'ची जाहिरात लागली ,
म्यूट करा रे बाबा ओरडले , ८०% जाहिरात आणि २० % प्रोग्राम असे झालंय टीव्हीचे ,वैतागून बाबा म्हनले.

'मोर द्या कसं वाटतंय ' राजू उत्साहाने म्हणाला .
काय ते , दादाची ट्यूब पेटली नाही .
'छान आहे , गणपती बाप्पा मोर द्या ' ताई म्हणाली .

काय चाललय , आरतीची तयारी झालीय ,लवकर चला , गुरुजी पण आलेत .
मग होऊन जाऊदे , आजोबा म्हणाले, 'नाहीतरी ईश्वराकडे आपण मागत असतोच, मग त्यात  कंजुषी कशाला ?'
'बोला , गणपती बाप्पा '
गगनभेदी आवाजात सर्व मंडळी ओरडली,"more  द्या "

No comments:

Post a Comment