Monday, 23 February 2015

कवीता

मुक्ताफळे मंत्र (ई )

जवान असतात मरण्यासाठी
मंत्री भ्रष्टाचार करण्यासाठी
मतदार वेडे ठरण्यासाठी
सज्जन निवडणूक हरण्यासाठी

सिंचन निधी चरण्यासाठी
मध्यमवर्ग Tax  भरण्यासाठी
मिडिया ओरडण्यासाठी
दिल्लीतील महिला घाबरण्यासाठी

अण्णा सत्याग्रह करण्यासाठी
म्हातार्यांनो संधी द्या तरण्यासाठी
पेन उचला काही खरडण्यासाठी
बदल करा सुधारण्यासाठी  

गरज आहे पुढे  या,
ह्या  वाचाळाना  आवरण्यासाठी

(०८ ऑगस्ट २०१३ "सैनिक शहीद होण्यासाठीच असतात" हे उद्गार आहेत बिहारच्या नितीशकुमार सरकारमधील ग्रामविकासमंत्री भीम सिंह यांचे! पाकिस्तानी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांसाठी अवघा देश हळहळत असतानाच मंत्री महोदयांनी हे तारे तोडले आहेत.त्यानंतर जनतेच्या मनातील विचार कवितेच्या रुपात )

No comments:

Post a Comment