Dear 'Du and Me buddies ',
काल (4th Aug 13) मी हे नाटक पाहिले ,मला खूप आवडले, details खालीलप्रमाणे,
Before i forget मला नाटकातील 'properties'च्या अतिशय कल्पक वापराचे कौतुक करू द्या,
१) स्क्रीन (हे हि नाटकातील एक पात्रच आहे असे वाटले ), पाहिजे तसे त्याचा TV , बॉली वूड सिनेमा, interactive (!) वागळे यांचा शो वगैरे.
२) light /music कमांड्स पात्रे खुल्लम खुल्ला openly देत होती--like
३) ड्रेसिंग /आरसा स्टेज वरच होता त्याचा हि वापर पुढच्या एन्ट्री साठी .like
४) wheelchair ची रिक्षा करण्याची कल्पना .like
५) सिनेमा ला काका फमिली (cartoons ) घेऊन जातात ,innovative कल्पना --like .
६) प्रेक्षक हि पार्ट ऑफ property आहे का असे हि वाटले --like
७) आणि अनेक.
Music : खूप impressive (रानडे thanks ) विशेषत: Du चे स्वागत करतांना पंजाबी/मराठी ढोल तर इतका जोसात होता कि पाया थिरकायला लागले .
(थोडे विषयांतर: मराठी बोअर लग्नांमध्ये हे रेकॉर्डिंग वाजवले पाहिजे म्हणजे तरी खुर्च्यांवर बसलेले लोक उठून नाचतील असे वाटले )
(music सहायक म्हणून शेवटी समोर आलेला मुलगा पाहून एवढा यंग असे काॅमेंट प्रेक्षकातून ऐकले,प्रसाद कुलकर्णी )
काल काय ऐकले ते खरे आहे का चं अर्थावरचे गाणे खूप धमाल जमले आहे.
शेवटचे जर्मन/मराठी गाणे खूप कॉन्विन्चिंग वाटले
अभिनय :
१) उदय ,:देवेद्र चा सहज सुंदर अभिनय, बेहद खुश झालो . त्यांचा overall स्टेज वरचा वावर pleasant वाटला .सासु सुनेच्या भांडणात पोलिस शिट्टीचा वापर खूप आवडला (घरोघरी अशा शिट्ट्या आणून ठेवल्या पाहिजेत !)
त्यातही आई साठी पार्सलिटी करताना हळुवार शिट्टी वाजवण्याचा सूक्ष्म अभिनय आवडला.
पूजेच्या वेळी अथर्वशीर्ष म्हणतांना ची गम्मत छान .
TV सिरियल सारखं वळून तीन तीन वेळा संवाद म्हणण्याची स्टाइल हि आवडली .
२) उमा /मैत्रीण : राधिका इंगळेचा खूप छान बोलका अभिनय व एनर्जी , मैत्रीण करतांना फास्ट movements करून यंग एज परिणामकारक .
३) मुलगी : अश्विनी फाटक ,चोख अभिनय ,फुल मार्क्स .
४) Du : मनोहर वेलणकर ,वेरी convincing ,हा खरच जर्मन आहेका अशी शंका येण्या इतपत खरा वाटला .
५) शेजारी/मित्र/आजी : हर्षद ,ह्या गुड लुकिंग मुलामध्ये खूप talents भरले आहेत ,आजीचे बेअरिंग आणि reactions भन्नाट केल्या आहेत ,मुळात आजीचा रोल मुलाने करण्याची कल्पना च ग्रेट आहे ती कशी सुचली ?
छोटे छोटे पंच त्याने छान केले जसे देव्हारा फिरविणे वगैरे.
ह्या ग्रुप कडून खूप अपेक्षा वाढल्या आहेत
कथानक : प्रत्यक्ष स्टेजवर पहाण्यातच मजा आहे.
दिग्दर्शक; अतिशय छोटा जीव असलेले कथानक कल्पकतेने फुलवलय ,बॉलीवूड शी आपण असे जोडले गेलोय हे खुबीने वापरलेले सिनेमा तले प्रसंग पाहतांना जाणवते ,हे श्रेय दिग्दर्शक यांना आहे.
श्रीरंग गोडबोले : बस नाम ही काफी है (खेतान सारखे … ) नाटक सुरु असतांना तीन वेळा लाईट गेले. अंधारात एक महाकाय आकृती स्टेज कडे सरकली ,"हा सीन सुरवातीपासून घ्या " म्हणाली, आवाजात जरब वाटली ,हे मिलिटरी कि पोलिस मध्ये होते का ? असे वाटले ,लाईट आल्यावर तो सीन झाल्यावर कळले त्या मध्ये जर्मन /पाश्च्यात्य संस्कृती ची झलक दाखवणारा पंच होता ,ते सलगता नसती तर मिस झाली असती ,हा लेखक/दिग्दर्शकाचा टच , हे श्रीरंग गोडबोले तर नाहीत असे वाटले ,तेच होते . त्यांचे लोकप्रभामधील राजा प्रधानजी आवडत होतेच. काल काय ऐकले ते खरे आहे का चं अर्थावरचे गाणे खूप धमाल जमले आहे.
काही सूचना ? काही नाही ,भट्टी छानच जमलीय ,कीप इट अप .
हे नाटक मित्रांना शिफारस कराल का ? strong येस .
हे नाटक पुन्हा पाहायला आवडेल का ? ओह येस .
No comments:
Post a Comment