Sunday, 22 February 2015

न रूपम अस्येह तथोपलभ्यते …. माझे नवीन interpretation




पुरुषोत्तमयोग : भगवतगीता अध्याय १५

न रूपम अस्येह तथोपलभ्यते
नान्तो न चादीर न च संप्रतिष्ठा
अश्वत्थ्म एनं सुविरूढमूलम
असंगशस्त्रेण दृढेन छित्वा ।।  १५.३


वर्षनुवर्षे आपण तोच घीसापिटा  अर्थ सांगतोय ,म्हणजे मागील पानावरून पुढे असा .
"संसारवृक्षाचे स्वरूप  सांगितले आहे, याचा आदी नाही, अंत नाही. तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही. म्हणून अतिशय घट्ट मुळे असलेल्या संसाररूपी अश्वत्थवृक्षाला बळकट वैराग्यरूप शस्त्राने कापून त्यानंतर त्या परमपदरूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे"

कधीतरी वरील श्लोकांचा अर्थ visualize करण्यासाठी आणि काही सामाजिक सुधारणेसाठी नव -कल्पना वापरून मी हा नवीन अर्थ लावलाय आणि माझा दावा आहे कि यापूर्वी कोणीच हा अर्थ लावला नाही
कुठलाही पूर्वग्रह न ठेवता हा विचार करूया,

आज तंबाखू च्या माफियाचा विचार केला तर हे दिसते कि या तंबाखू च्या जागतिक गुप्त विस्तार जगातील सर्व  सरकार दरवेळी एवढा कर लावूनही या वटवृक्ष किंवा विषवृक्ष चा विस्तार वाढतोच आहे याची कुणी स्थापना केली कुठे आरंभ आहे कुठे शेवट आहे कुणालाच काहीच कल्पना नाही, जगाला पुरून उरेल एवढ्या तंबाखूचे पीक कोण कुठे घेते कुणालाच माहित नाही ,या व्यवसायाची पाळेमुळे घट्ट आहेत आणि जगभर करोडो लोक तसेच तरुणवर्ग याच्या जाळ्यात सापडला आहे त्यांच्या पैशाचे आणि आरोग्याचे नुकसान होत आहे.

ह्यावर उपाय म्हणजे " असंगशस्त्रेण दृढेन छित्वा", म्हणजेच आपल्याला विळखा घालणाऱ्या या विषवृक्षाच्या फांद्या "असंगाच्या शस्त्राने "  (weapon of detachment) "दृढ निश्चयाने कापल्या" पाहिजेत . हे आपण तेव्हाच करू शकू जेव्हा आपल्याला ह्या अश्वत्थ रुपी ऑक्टोपस चे दिव्य दृष्टीने दर्शन होईल.(हे दर्शन घडवणे हे प्रवचनकारांचे  काम आहे)

तत: पदं तत परिमर्गितव्यम ।

यानंतर अशा लाइफस्टाईल चा शोध घ्यायचा कि व्यायाम,मैदानी खेळ वगैरे कि आपण पुन्हा त्या व्यसनाच्या जाळ्यात सापडणार नाहि.
हाच तो नवीन विचार व  नवीन अर्थ .

राजेश मोराणकर  Date: 29 Mar 2013 11:18

No comments:

Post a Comment