मदत
ठाकले दिल्लीत
पृथ्वी व माणिक
दो चार आणिक
मोहिमेस
राज्यात दुष्काळ
हजार तीन कोटी
तात्काळ द्यावे हाती
आधारास
मंत्री वदले प्रधान
घ्या आर्थिक दक्षता
लावल्या कि अक्षता
वाटण्याच्या
म्हणे नाही घाई
बाबा ते शालीन
बोले अति लीन
वाट पाहू
उसळले पवार
खेचतो मी मदत
द्या मज मुदत
पंद्रादिस
खंतावले बाबा
पाहून रिक्त कटोरा
नाही काही चिटोरा
बोटभर
नाहीं विचारले राष्ट्रवादी
आणिकास म्हणे पवार
नाहीं राज्यकारभार
पोरखेळ
रयत मोजी दिस
वाणी ती शरद
दिल्ली कधी वरद ?
महाराष्ट्री
21/02/2014
No comments:
Post a Comment