Monday, 23 February 2015

कविता

   झाडे

झाडे झुरतात
झाडे झरतात
झाडे करतात
हिरवी प्रीत

झाडे एक रंग
झाडे एक मलंग
झाडे कशी दंग
फकीरीत

झाडे बोलतात
झाडे मोल त्यात
झाडे तोलतात
आसमंत

झाडे जणु नक्षी
झाडे आकाश-लक्षी
झाडे प्राणपक्षी
जागवित

No comments:

Post a Comment